Sahaj suchlela!
जुनी गाणी ऐकणं माझा सर्वात आवडता उद्योग! कधी कधी तर वाटतं काही चुकतंय कि काय आपलं ? वेगळे आहोत का आपण माझ्या वयाच्या बाकीच्या लोकांपेक्षा ? पण मला माहिती आहे, असं नाहीये, कारण माझ्यासारखे बरेच आहेत खरं म्हणजे. खूप आठवणी निगडित आहेत ह्या गाण्यांशी, त्या वेळच्या भावना, मनातले विचार, हे सगळं डोळ्यापुढे उभं राहता अगदी! त्यातल्या बऱ्याचश्या भावनांना सद्य परिस्थितीत काही अर्थ नसतो, बऱ्याचदा हसूच येतं ते सगळं आठवून , कि आपण कसे बालिश होतो. पण तरीही ते सगळं, ते दिवस, तेव्हाचे आपण .. छान असतं त्यात रमणं. शान्त आणि सुखद!
लहानपणी झोपताना रोज रात्री आईकडे हट्ट असायचा,"गोष्ट सांग ", "गाणं म्हण" आईजवळ झोपणं आणि तिच्याकडून गाणं ऐकणं हे तेव्हा ही स्वर्गसुख होतं आणि आत्ताही! आईचा आवाज खूप गोड होता आणि अजूनही आहे. फार कौतुक वाटतं मला ह्या बाबतीत आईचं, गाणं शिकली होती ती , आवड आणि प्रतिभा दोन्ही होतं , मनात आणलं असतं तर ह्या क्षेत्रात काहीतरी करण्याची पूर्ण क्षमता होती, पण परिस्थितीच्या ओघात नोकरी जास्त महत्वाची होती आणि मग गाणं मागे पडलं . मला आज ह्या गोष्टीचं थोडसं वाईट वाटतं. आणि आश्चर्य ह्या गोष्टीचं कि तिला ह्याची तिळमात्रही खंत नाही, किंवा मला तरी तसं जाणवू दिलं नाही.

Comments
Post a Comment